प्रशांतने सुरु केलेले T School म्हणजेच थिएटर स्कूल ही खऱ्या अर्थाने अभिनयाची शाळा आहे. मी आजवर प्रत्येक batch साठी मार्गदर्शक म्हणून येत आहे. येथे मिळणारे शास्त्रोक्त शिक्षण आणि जोडीला संगीत नृत्याच्या ज्ञाना मुळे अनेक गुणवान आणि परिपूर्ण कलाकार घडत आहे.. लोकांची भाऊगर्दी न करता अत्यंत मर्यादित प्रवेशामुळे येथे प्रत्येकाकडे योग्य लक्ष देता येते.T school विद्यार्थी हा अतिशय गुणी कलाकार असेल अशी माझी खात्री आहे.

सुरेश खरे

नाट्य प्रशिक्षणाच्या छोट्या कार्यशाळा अनेक होतात मात्र, प्रशांत दामले सारखा अनुभवी कलाकार स्वत: मागदर्शन करत असल्यामुळे T school च्या मुलांची वाटचाल योग्य दिशेने होत आहे, ह्यांत संशय नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे, नाटक - चित्रपटात काम मिळवून देण्याचा कोणताही आव आणला जात नाही. अभिनयासह नृत्य, संगीताचेही येथे उत्तम मार्गदर्शन मिळते.

पुरषोत्तम बेर्डे

मी इथल्या मुलांची अभिनय , नृत्य आणि गायनाची प्रात्यक्षिक पाहिली आणि ह्या संस्थेचे वेगळेपण जाणवले. प्रशांत गुणवत्तेशी तडजोड करत नाही हे याही उपक्रमाद्वारे दिसून आले. भविष्यात अनेक उत्तम कलाकार ही संस्था घडवेल यात शंकाच नाही.

रिमा

दररोज लाखो लोक ग्लॅमरला भुलून या क्षेत्रात काहीतरी करण्याच्या हेतूने येतात मात्र योग्य दिशा न मिळाल्यामुळे भरकटत जातात. प्रशांतच्या T school सारख्या परिपूर्ण संस्थे मधून मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळत आहे. अर्थातच T school मध्ये मिळणाऱ्या शिक्षण आणि शिस्तीमुळे अनेक शिस्तबद्ध कलाकार घडतील याबद्दल माझ्या मनात कुठलाही संदेह नाही.

शरद पोंक्षे

मराठी रंगभूमीवर काम करताना तुमच दिसणं , तुमचा मेकअप , नाटकाचे नेपथ्य , नाटकाचे संगीत इत्यादी गोष्टी नंतर येतात. सर्व प्रथम महत्व आहे ते तुमचे मराठी भाषेवर किती प्रभुत्व आहे. त्याला स्वच्छ मराठी बोलणे, ते समजून बोलणे , उत्तम पाठांतर असणे इत्यादी गोष्टी अत्यावश्यक आहेत आणि ह्याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करून T school मध्ये मुलांना शिकवले जाते हे बघून मलाआत्यंतिक समाधान मिळाले.

कविता मेढेकर

ज्या मुलांना खरच ह्या क्षेत्रात येऊन करियर करायची ईच्छा आहे त्यांना T school हा उत्तम पर्याय आहे. गुणवत्ता आणि शिस्त ह्याचा सुरेख मेळ साधत येथे अनेक गुणवंत कलाकार घडत आहेत.

सुबोध भावे

मराठी रंगभूमीवर काम करण्यासाठी काय कराव लागेल अस मला कोणी विचारल की मी त्यांना सांगतो T school मध्ये जा इतकी परिपूर्ण, शिस्तप्रिय आणि रंगभूमिला आवश्यक असणाऱ्या सर्वबाबींचा साकल्याने विचार करणारी ही संस्था आहे. तेथील Faculties आणि प्रशांत दामले ह्यांना मनापासून ध्यन्यवाद.

प्रसाद ओक

मराठी industry मधे नविन आणि गुणवत्ता असलेले चेहेरे येत नाहीत अशी जी ओरड सुरु आहे त्याला चोख उत्तर T school चे कलाकार देतील असे मला इथे आल्यावर जाणवले. अजूनही आज मराठीत नाममात्र अनेक संस्था आहेत मात्र शास्त्रोक्त अभिनय प्रशिक्षण देणाऱ्या ह्या संस्थेचे वेगळेपण हे येथील कलाकारच दाखवून देतील हा माझा ठाम विश्वास आहे.

संतोष पवार

T-school मुलांना नुसती अमिषे दाखवत नाही ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्वतःला तपासण्यासाठी T-school उपयुक्त आहे. प्रशांत दामले मुलांना स्वतः शिकवतात हे मुलांचे नशिबच आहे. येथे शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही. T-school मुळे विद्यार्थ्यांना नक्कीच वाव मिळेल.

सुनील बर्वे

T-school च्या मुलांना एकाच ठिकाणी अभिनय, संगीत, नृत्य ह्या सर्व गोष्टी शिकायला मिळतात. संगीत आणि नृत्य अभिनयाला पूरक आहे त्यातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासही साधला जातोय. T-school च्या सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेछा !.

अशोक पत्की

प्रशांत दामले यांच्या अनुभवचा फायदा या विद्यार्थ्यांना होत आहे. चित्रपट सृष्टीच्या दृष्टीने प्रशांत दामले यानि उपलब्ध करून दिलेले हे t-school चे व्यासपीठ अतिशय महत्वाचे आहे. माझ्या पुढच्या चित्रपटसाठी T-school च्या काही विद्यार्थ्यांना मी निश्चितपणे संधी देइनच देइन.

सतीश राजवाडे

T-school मुळे सर्वगुण संपन्न होणे १००% शक्य आहे. रोजच्या रोज अभिनय, नृत्य व गायन ह्या तिनहीचाही सराव केल्यामुळे विद्यार्थी स्वतः आत्मविश्वासाने सदर करतात. शिस्तबद्ध रियाज आणि उत्तम शिक्षक हे T-school चे वैशिष्टय म्हणावे लागेल.

मयूर वैद्य