प्रिय मित्रांनो व मैत्रिणींनो ,

कुठेही आणि कुठल्याही भाषेत अभिनय करायचा असेल तर त्या भाषेवर प्रभुत्व असणे हे अत्यावश्यक आहे.


आजच्या पिढीचे ऐकणे व बघणे जास्त आहे पण वाचन फारच कमी आहे. तसेच मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारतांना मराठी, इंग्रजी, हिंदी अशा संमिश्र भाषांमधे बोलले जाते. त्यामुळे होते काय की कुठल्याच भाषेवर प्रभुत्व प्राप्त होत नाही.


अभिनय क्षेत्र म्हणजे फक्त प्रसिद्धि, ग्लॅमर / वलय, मोहमयी विश्व, पैसा असे नव्हे ..... त्यामधे सातत्याने केलेले अथक परिश्रम, गतिमानता, याचबरोबर वाचिक - स्वरात्मक, स्पष्टता, शारिरीक लवचिकता, कल्पकता, शब्दोच्चार, बोलण्याची विशिष्ठ पद्धत, बोलण्या-चालण्यातील ढब - Body Language, आणि इतरही बरेच काही.....


ह्या अभ्यासक्रमाचा संबंध हा मराठी / हिंदी मालिका, चित्रपट, गायन व नृत्याच्या कार्यक्रमांशी तसेच व्यवसायिक रंगभूमीशी निगडीत असल्यामुळे "Theatre" मधला "T" डोळ्यासमोर ठेवून "T-School" ची स्थापना केली आहे.


रंगभूमीवर येणाऱ्या नविन पीढीचा भाषेचा पाया तयार करुन घेणे व अभिनयातले बारकावे समजावून देणे हा ह्या "T-School" चा उद्देश आहे.


ह्या "T-School" मधून शिकणाऱ्या कलावंताना अभिनयाशी संबंधित सर्व क्षेत्रांची ओळख करून दिली जाईल ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाला एक नवे परिमाण मिळेल.


सर्व भावी कलावंताना मनापासून शुभेच्छा !


- प्रशांत दामले.

T-School च का ?

गेली ३० वर्ष मराठी रंगभुमीवर सातत्याने विविध प्रकारच्या भुमिका वठवून जागतिक विक्रम करणाऱ्या श्री प्रशांत दामले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली T-School मधील अभिनयाच्या प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आली आहे.

T-School चे वेगळपण कशात आहे ?


Weekly Batch मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची audition घेतली जाते व त्याचवेळी त्यांच्या गुणदोषांचे मूल्यांकन केले जाते व ज्यावेळी प्रशिक्षण सुरु होते त्याचवेळी त्या विद्यार्थ्याला त्याच्या मूल्यांकनाची जाणिव करुन दिली जाते आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणात त्या त्या विद्यार्थ्यांमधील दोषांचे निराकरण केले जाते.


अभिनय ही प्रत्यक्ष करुन बघायची गोष्ट आहे त्यामुळे रोजच्या रोज शिस्तबद्ध प्रात्यक्षिक करुन त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी मेहनत घेतली जाते.


प्रशिक्षणाच्या काळात मिळालेल्या सखोल आणि सकारात्मक मार्गदर्शनामुळे आपल्यातील सुप्त गुणांची ओळख होते आणि त्यामुळे प्रशिक्षणार्थीचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास होतो.


नाटक ही सांघिकपणे करण्याची गोष्ट आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या मानसिकतेच्या सहप्रशिक्षणार्थी बरोबर एकत्रितपणे काम करताना वेगळी कसोटी लागते.


प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडे वैयक्तिक लक्ष ही T-School ची फार मोठी जमेची बाजु आहे.