प्रिय मित्रांनो व मैत्रिणींनो ,

कुठेही आणि कुठल्याही भाषेत अभिनय करायचा असेल तर त्या भाषेवर प्रभुत्व असणे हे अत्यावश्यक आहे.


आजच्या पिढीचे ऐकणे व बघणे जास्त आहे पण वाचन फारच कमी आहे. तसेच मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारतांना मराठी, इंग्रजी, हिंदी अशा संमिश्र भाषांमधे बोलले जाते. त्यामुळे होते काय की कुठल्याच भाषेवर प्रभुत्व प्राप्त होत नाही.


Read More

T-School च का ?

गेली ३० वर्ष मराठी रंगभुमीवर सातत्याने विविध प्रकारच्या भुमिका वठवून जागतिक विक्रम करणाऱ्या श्री प्रशांत दामले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली T-School मधील अभिनयाच्या प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आली आहे.

T-School चे वेगळपण कशात आहे ?


Weekly Batch मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची audition घेतली जाते व त्याचवेळी त्यांच्या गुणदोषांचे मूल्यांकन केले जाते व ज्यावेळी प्रशिक्षण सुरु होते त्याचवेळी त्या विद्यार्थ्याला त्याच्या मूल्यांकनाची जाणिव करुन दिली जाते आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणात त्या त्या विद्यार्थ्यांमधील दोषांचे निराकरण केले जाते.


अभिनय ही प्रत्यक्ष करुन बघायची गोष्ट आहे त्यामुळे रोजच्या रोज शिस्तबद्ध प्रात्यक्षिक करुन त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी मेहनत घेतली जाते.


उत्तम अभिनयाची गुरुकिल्ली

  • आपण आत्मविश्वासाने अभिनय कधी करू शकतो ?
    जेव्हा संहिता आपली तोंडपाठ होते तेव्हा .
  • आपण योग्य अभिनय कधी करू शकतो ?
    जेव्हा सहिंतेचा आपल्याला अर्थ कळतो तेव्हा .
  • आपण उत्स्फूर्त अभिनय कधी करू शकतो ?
    जेव्हा सहिंतेच्या अर्थाप्रामाणे आपण सादरीकरण करतो तेव्हा .

आपण उत्तम अभिनय कधी करू शकतो ?

आत्मविश्वासाने केलेला योग्य अभिनय , उत्स्फुर्त अभिनय व
आंगिक अभिनय यांचा योग्य संगम होतो तेव्हा .

Testimonials

...

प्रशांतने सुरु केलेले T School म्हणजेच थिएटर स्कूल ही खऱ्या अर्थाने अभिनयाची शाळा आहे. मी आजवर प्रत्येक batch साठी मार्गदर्शक म्हणून येत आहे. येथे मिळणारे शास्त्रोक्त शिक्षण आणि जोडीला संगीत नृत्याच्या ज्ञाना मुळे अनेक गुणवान आणि परिपूर्ण कलाकार घडत आहे.. लोकांची भाऊगर्दी न करता अत्यंत मर्यादित प्रवेशामुळे येथे प्रत्येकाकडे योग्य लक्ष देता येते.T school विद्यार्थी हा अतिशय गुणी कलाकार असेल अशी माझी खात्री आहे.

सुरेश खरे

...
नाट्य प्रशिक्षणाच्या छोट्या कार्यशाळा अनेक होतात मात्र, प्रशांत दामले सारखा अनुभवी कलाकार स्वत: मागदर्शन करत असल्यामुळे T school च्या मुलांची वाटचाल योग्य दिशेन होत आहे, ह्यांत संशय नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे, नाटक - चित्रपटात काम मिळवून देण्याचा कोणताही आव आणला जात नाही. अभिनयासह नृत्य, संगीताचेही येथे उत्तम मार्गदर्शन मिळते.

पुरषोत्तम बेर्डे

...

मराठी रंगभूमीवर काम करताना तुमच दिसण , तुमचा मेकअप , नाटकाचे नेपथ्य , नाटकाचे संगीत इत्यादी गोष्टी नंतर येतात. सर्व प्रथम महत्व आहे ते तुमचे मराठी भाषेवर किती प्रभुत्व आहेत्याला. स्वच्छ मराठी बोलणे, ते समजून बोलणे , उत्तम पाठांतर असणे इत्यादी गोष्टी अत्यावश्यक आहेत आणि ह्याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करून T school मुलांना शिकवले जाते हे बघून मलाआत्यंतिक समाधान मिळाले.

कविता मेढेकर

...

दररोज लाखो लोक ग्लॅमरला भूलून या क्षेत्रात काहीतरी करण्याच्या हेतूने येतात मात्र योग्य दिशा न मिळाल्यामुळे भरकटत जातात. प्रशांतच्या T school सारख्या परिपूर्ण संस्थे मधून मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळत आहे. अर्थातच T school मिळणाऱ्या शिक्षण आणि शिस्तीमुळे अनेक शिस्तबद्ध कलाकार घडतील याबद्दल माझ्या मनात कुठलाही संदेह नाही.

शरद पोंक्षे